Kshitija Bapat

Tragedy


4.0  

Kshitija Bapat

Tragedy


कुपोषण

कुपोषण

1 min 309 1 min 309

रानातली ही फुले

दुर्गम डोंगर भागातले

इवली इवली ही मुले

राजे ही घाटातले


कुपोषित ही बालके

दिसतात लुकडे सुकडे

भटकतात इकडे-तिकडे

दारिद्र्याचा यांना श्राप


दुर्लक्षित करतात माय-बाप

शिक्षणाचा होतो यांना ताप

जीवनसत्त्वाअभावी

मंद झाली त्यांची वाढ


पोषक आहाराअभावी

दिसतात ती कुपोषी

अज्ञानामुळे थांबली प्रगती

गरीबी त्यांची लाचारी


सदा पडतात आजारी

अन्नासाठी वणवण भटकंती

दुर्लक्षित करतात पुढारी

कोणीही त्यांना न विचारी


कुपोषित ही बिचारी

पोटभर अन्न मिळण्याचे

हे आहे अधिकारी


Rate this content
Log in

More marathi poem from Kshitija Bapat

Similar marathi poem from Tragedy