STORYMIRROR

Sushama Gangulwar

Romance

3  

Sushama Gangulwar

Romance

कुणी तरि हवं असतं

कुणी तरि हवं असतं

1 min
584

कुणी तरी हवं असतं 

बाह्य सौंदर्या पेक्षा 

आत्मीय सौंदर्य जाणणार......


कुणी तरी हवं असतं 

तुम्ही धरला अबोला 

तर हळूच समजूत काढणार......


कुणी तरी हवं असतं 

मांडता येत नसतील भाव मनातले 

तर मुक्या शब्दांचं अर्थ जाणणार.....


कुणी तरी हवं असतं 

तुम्ही जरी रागावलत 

तरी हळूच हसत बोलणार.......


कुणी तरी हवं असतं 

सुख दुःखाच्या वाटेवर 

क्षणिक वेळ देणारं.......


कुणी तरी हवं असतं 

-हदयातील भाव ओळखून 

हळवं मन जपणार.......


कुणी तरी हवं असतं 

माझं तुझं म्हणण्यापेक्षा 

फक्त आपलं म्हणनार........


कुणी तरी हवं असतं 

जीवनाच्या प्रत्येक वळणावर 

शेवट पर्यंत साथ देणारं.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance