STORYMIRROR

pranav kode

Tragedy Others

4  

pranav kode

Tragedy Others

कुणी सुधारतात नाहीये...

कुणी सुधारतात नाहीये...

1 min
266

ऐकलेला तसा बराच दुष्काळ

सुका, कोरडा,जीव जाळणारा

ह्या वर्षी मात्र प्रत्यक्ष अनुभवलेला

संसार वाहून नेणारा

शाळा गेली पुस्तक गेली

सारं सारं वाहून गेलं

शेतासकट पीक गेलं,

गोठ्यासकट जनावर गेलं

पाऊस नव्हताच बसणारा तो

कोण जाणे कोण होता

अश्रू नव्हता ढाळत तो

जीव तोडून कोसळत होता

त्याच तरी काय म्हणा

त्याच काम तो करत होता

माणसांसारखाच तोही

आता अतिरेक करायला शिकला होता

तरी कुणी सुधारत नाहीये

मृत्यू समोर दिसतानाही

प्रत्येकजण वाट बघतोय

पाणी नाकाशी येण्याची 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy