STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

कुणी घर देता का घर!!

कुणी घर देता का घर!!

1 min
265

कशीबशी जमवाजमव करुन....

उरलेले कर्जही काढून ......

दोन बेडरुम्स फ्लॅट होतो......

लेकाच्या लग्नानंतर तिसरे येता......

लवकरच फ्लॅट अपुरा पडतो...

छान आलिशान फ्लॅटचे ......

गाजर दाखवले जाते......

पण त्यासाठी स्वतःच्या घरावर......

पाणी सोडावे लागते........

वाढते वय , वाढत्या तक्रारी ...

शारिरीक अन् मानसिकही.....

एकटे रहायची धमक नसते.....

शरीर आता थकलेले असते.....

रवानगी वृद्धाश्रमात होते.....

क्षणात होत्याचे नव्हते होते....

काही बोलून उपयोगच नसतो.......

हातातून बाण सुटलेला असतो.....

काय करायचं अशा वेळी?......

रडायला कुणाच्या पडायचं गळी?......

डोळे येतात भरुन........

आठवणी येतात दाटून......

केलेल्या फसवणुकीचे आपण धनी झालो म्हणून........

आयुष्याच्या मेहनतीवर पाणी पडले म्हणून........

त्यावेळी निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य नव्हते म्हणून......

कुणी घर देता का घर.....

प्रश्नाला नसते उत्तर ......

आर्त मनाचा आक्रोश......

अंतर्मनाला भिडतो......

अशा वेळी उपायच नसतो.....

सही करताना सावध रहायला हवे......

हक्काचे घर द्यायला सांगायला हवे.....

नशिबाचे भोग भोगावेच लागतात......

काही गोष्टी पराधीनच असतात......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract