STORYMIRROR

मैथिली कुलकर्णी

Inspirational Others

4  

मैथिली कुलकर्णी

Inspirational Others

कष्टाची वाट

कष्टाची वाट

1 min
274


प्रतिदिन सुखाचे

दारात लोळण.....

परि मन माझे

आहे का विराण ।।


धावते हे जग

स्पर्धाही अफाट.....

अस्तित्व टिकवताना

होते फरफट ।।


कष्टाची वाट ही

मोठी खडतर.....

चालताना ती

झेलले प्रहार ।।


संघर्ष करताना

बदलले मुखवटे....

माझ्याच दुनियेत

मन माझे एकटे ।।


अस्वस्थ असे मन

बोलले मला हे.....

विसरून देह भान

जग, मोहक क्षण हे ।।


ध्येय गाठताना

मन मलाच सांगे.....

राहा प्रामाणिक तू

तुझ्याच सांगे ।।


सुंदर विचारपुष्प

मनी रेंगाळतात.....

विराण मनात या

सुगंध पसरवतात ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational