कष्ट
कष्ट
ना भरजरी शालू
ना केसात माळला गजरा
डोक्यावर डोंगर कष्टाचा
अन् चेहरा तिचा हसरा
कपाळावरचा गळता घाम
हीच तिची संपत्ती
पैशात तोलता येणार
नाही चेहऱ्यावरची श्रीमंती
शामल तिची कांती
काळ्याभोर केसांच्या बटा
कणखर तिची बाजू
अन् मळखोर दगडी वाटा..
ना भरजरी शालू
ना केसात माळला गजरा
डोक्यावर डोंगर कष्टाचा
अन् चेहरा तिचा हसरा
कपाळावरचा गळता घाम
हीच तिची संपत्ती
पैशात तोलता येणार
नाही चेहऱ्यावरची श्रीमंती
शामल तिची कांती
काळ्याभोर केसांच्या बटा
कणखर तिची बाजू
अन् मळखोर दगडी वाटा..