संध्याकाळी
संध्याकाळी
निळ्या नभाचा रंग
बदलला संध्याकाळी
घन व्याकुळ हा डोह
वितळला संध्याकाळी
सूर्यासाठी तिने
सोसली तगमग सारी
थंड गारवा जरा
पसरला संध्याकाळी
आभारावर दाटली
झाडी गर्द घनांची
सुगंध मातीचा
दरवळला संध्याकाळी
दिवसभराचा दाह सोसतांना
सूर्य क्षितिजावरी
मावळला संध्याकाळी...