समाधान
समाधान
समाधानाला मोजमाप आहे
ना कसली मर्यादा
मनाचा निखळ आनंद
नसतो कसला तगादा
आहे ते पूरक सगळे मनाला
अपूर्णतेची झलक नाही
असंतृष्टीची विषबाधा
ओंजळीतले अवकाश भरपूर
मूठभर ही पुरेपर
जीवन सुखाचा सोहळा
तक्रार नाही, नाही
कुठलीच हाव मनाला ज्यादा
नाचती कठपुतली नको
जीवाला अपेक्षांचा मारा
तृप्त मन काठोकाठ
आयुष्यात मनीचा शहजादा..