STORYMIRROR

Gangadhar joshi

Abstract

3  

Gangadhar joshi

Abstract

पाऊस गौळण

पाऊस गौळण

1 min
1.2K

काय करू मी कस ग जावू

शालु पावसानं भिजला

ग बाई शालू पावसानं भिजला ll 


आजच बाई घडी मोडली

जरतारी मी शालू नेसली

अवचित आला कान्हा होवूनी

धीर ग त्यांनी सोडला 


काळा जांभळा गर्द निळा

टपून बसला अवचित वेळा

भारलेला खाली वाकला

रिती रिवाज त्यांनी मोडला


टप टप टप चाल चतुराची

नक्षी विणले मोर पिसांची

पडता थेंब कणा कणातूनी

केसराचा वास सुटला

ग बाई शालू पावसाने भिजला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract