वास्तुपुरुष ....!
वास्तुपुरुष ....!
वास्तु कशी ?
डेरेदार पिकलेल्या आंब्यांनी
लदबदलेल्या झाडासारखी ....
वास्तुतली माणसं कशी ?
आंब्यातील मधुर , रवेदार
रसासारखी ....
आणि , वास्तुपुरुष कसा ?
आंब्यातील कोयीसारखा ,,,,
सगळ्यांना एकत्रित जोडणारा
पण , सर्वांहुनी वेगळा ,,,,
विलग , ठाम , खंबीर
चिरेबंदी पर्वतासारखा ....!!!