घाम
घाम
मानवी शरीर हे
महत्त्व असे घामाला
घामच फेकतो
शरीरातील विष द्रव्याला
मेहनत, व्यायाम करता
घाम चांगला तनमन
तंदुरुस्त त्याचे रोग न जीवाला
जीव घाबरता फुटतो
घाम ज्याला आंतरिक
भीती बघा घाबरविते त्याला
थरकाप होवूनी सुटे
ज्याचा घाम सर्वांगाला हृदयविकाराचा झटका
समजा त्याला
सर्वार्थानी सुंदर घाम
पाहतो जो शरीरी
बळीराजा कष्ट करी शेतावरी शरीर बळकट तो
पचवी मीठ भाकरी
मृदगंध त्याचा घामाला
साऱ्या भूवरी..