STORYMIRROR

Dinesh Kamble

Action

3  

Dinesh Kamble

Action

शेती ना करणार म्या..

शेती ना करणार म्या..

1 min
5.2K




उभं करपल रान

कसा खेळ नियतीचा...

नाव शेतीच ऐकुनी.

गोळा उठतो भीतीचा...


काय पिकवू शेतीत.

रानोमाळ ती ढेकळं...

हल्ली बाराही महिने.

रान असतं मोकळं...


कधीकधी येई मना.

टाकू बूजूनी विहीर...

थेंबभर पाणी नाही.

तरी नुसती फिकीर...


बाप माझा सांगे मला.

माती ती आपुली आई...

मंग आपली रे बाबा

तीला फिकीर का नाही..


जरी पिकली रानात.

कधी जोंधळा कणसं...

तरी मातीमोल सारी.

मांगतात हो माणसं...


सडेतोड मी बोललो.

कालरात्री बापाला त्या...

भले करेल हमाली

शेती ना करणार म्या..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action