STORYMIRROR

Savita Jadhav

Action Inspirational

3  

Savita Jadhav

Action Inspirational

काळजी

काळजी

1 min
11.7K

हसतं खेळतं रूप साऱ्या पृथ्वीचं पालटलं,

कोरोनाच्या थैमानाने सारं जगच हादरलं.

थोड्या कालावधीतच होत्याचं नवतं झालं

कळेना कसं कधी संकट हे ओढावलं.


परप्रांतातून आला आहे आजार,

आजाराने त्या सारे विश्वचि बेजार, 

देता येईना एकमेकांना आजारात आधार,

माजला आहे सगळीकडे एकच हाहाकार.


जाऊ नका, राहू नका कुणीही घोळक्यात,

साऱ्या जगालाच त्याने घेतलय विळख्यात,

घेतली साऱ्यांनी काळजी तर येईल आटोक्यात,

रहावे सगळ्यांनी घरात उंबरठ्याच्या आत.


सर्वेक्षण करून मिळाले सिग्नल तीन,

रेड झोन,आँरेंज झोन,आणि एक ग्रीन,


रेड झोनवाले आहेत संकटाच्या घेऱ्यात,

रहा पूर्णपणे बंद घरी नका फिरू तोऱ्यात.

आँरेंज वाल्यांना मिळाली थोडीशी शिथिलता,

पण पाळा नियम सारे नको काही उताविळता.

 

ग्रीन सिग्नल वाल्यांना आहे सौम्य जरा कायदा,

तरीही उचलू नका याचा कुणीही गैरफायदा,

असेल ग्रीन झोन तरी एक गोष्ट खरी,

आजार जडण्यापूर्वीच काळजी घेतलेली बरी.


डॉक्टर, नर्सेस, पोलिस, प्रशासन कर्मचारी,

प्रत्येक जण झटतोय आपापल्या परी,

संकटात या आहे सहकार्याची गरज खरी,

दिर्घ आयुष्यासाठी रहावे आपापल्या घरी.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action