Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Tragedy Action

3  

Chandan Pawar

Tragedy Action

काकस्पर्श

काकस्पर्श

1 min
338


प्रथा- परंपरांचा समाजात

दिसतोय विनोदी गफला ;

म्हणून कुत्रे- कावळे म्हणतात

भाद्रपद आहे फक्त आपला.


पूर्वजांचे श्राद्ध घालण्याचा

पितृपक्षात पारंपारिक आदर्श ;

जिवंतपणी दुर्लक्षित असणाऱ्या

पितरांच्या पिंडाना " काकस्पर्श "


खालच्यापेक्षा वरच्यांना जेवू

घालण्यात कुठलाय त्रास ?


पितरांच्या घासाला शिवण्यासाठी

कावळ्यांची मनधरणी ;

पितृपक्ष जेवणातील खास मेनू

दिसतोय पितरांच्या चरणी.


मृतातम्यांच्या मुक्तीसाठी

श्राद्धचा पर्याय सुलभ ;

प्रचंड वृक्षतोडीने पितरांच्या

पिंडाला काकस्पर्श दुर्लभ .


प्रथा-परंपरा आपण

डोळसपणे पाळाव्या ;

पर्यावरणाचा ऱ्हास होईल

अशा गोष्टी टाळाव्या .



Rate this content
Log in