STORYMIRROR

SWATI WAKTE

Action

3  

SWATI WAKTE

Action

नवरात्र

नवरात्र

1 min
2.3K

नऊ दिवसाचे नवरात्र

भारतीय संस्कृतीचे आहे सत्र

अन्नधान्य पिकविण्याची शिकवण

घेऊ घटस्थापना करून

शेती पिकवू झाडें लावू

शेतीच आहे देवी जाणू


नऊ दिवसाचे नवरात्र

अन्न हे पूर्णब्रम्ह

होमहवन करून

पर्यावरणाचे करू संरक्षण

उपवास करून

मनावर मिळवू ताबा

नऊ दिवसाचे नवरात्र

पर्यावरणाचे करू रक्षण


कन्याभोजन करून

कन्या देवीचे रूप जाणू

स्त्रीभूण हत्या थांबवू

मुलगा मुलगी समान मानू

नऊ दिवसाचे नवरात्र

स्त्रीजन्माचे करू स्वागत


अंबेने केला राक्षसाचा संहार

स्त्रीनेही करावा अन्यायाचा प्रतिकार

स्त्री हे अंबेचे रूप जाणा

स्त्रियांवरील अत्याचार टाळा

नऊ दिवसाचे नवरात्र

स्त्रीशक्तीचा करू जागर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action