क्षणभर विश्रांती
क्षणभर विश्रांती




क्षणभर विश्रांती,
आहे खूपच मोलाची,
होते मरगळ दूर मनाची,
चाहूल मिळते नव्या उल्हासाची,
रोजच्या धकाधकीच्या जीवनात,
स्वतःला थोडातरी वेळ द्यावा,
होतो हलका सगळाच ताण,
मनाला पण मिळतो थोडा विसावा.
कामाचं रहाटगाडगे....
नेहमीच असतय सुरू,
कधीतरी लोड येतो,
वाटतं काय करु,न काय नको करू.
थोडासा विसावा पण...
आहे खूपच गरजेचा,
शरीर आणि मन दोन्हीसाठी,
विसावा बनतो स्रोत उर्जेचा.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿