STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

3  

Pandit Warade

Inspirational

क्षणभर थांब

क्षणभर थांब

1 min
240

क्षणभर थांब

लत नाही बरी

नको तू जाऊस

व्यसना आहारी


क्षणभर थांब

नको करू चूक

बरी नव्हे गड्या

ही सत्तेची भूक


क्षणभर थांब

कर हा विचार

पैसा गाडी माडी

संगे ना येणार


आलास रिकामा

जाशील रिकामा

जातांना हा पैसा 

नाही रे कामाचा


क्षणभर थांब

विचार तू कर

संत संगतीचा

मार्ग भला धर



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational