"क्षणभंगुर आयुष्य "
"क्षणभंगुर आयुष्य "
कधी,कसा, कोठे मृत्यू येईल
हे सांगता येत नाही
जगुन घेवु प्रत्येक क्षण
जो पुन्हा येणे नाही
कशाला धावायचं ऊर
फुटेपर्यंत उद्याच्या साठी
माहित नाही किती शिल्लक
आयुष्य आपल्या गाठी
येईल मरण एके दिवशी
अन ठोठवेल दार
कसा देवू शकुत
त्यासोबत जाण्यास नकार
कशाला करीत बसायची
व्यर्थ कशाची तरी चिंता
करून घेऊ जे करायचे ते
आज ,या क्षणी , आत्ता
जाणीव ठेवु आयुष्य आहे क्षणभंगुर
माहित नाही उरले किती अजुन अंतर
करु आनंदाने प्रत्येक क्षण पार
नसेल खेद जरी आला मृत्यू समोर
