STORYMIRROR

Seema Gandhi

Classics

3  

Seema Gandhi

Classics

क्षणात मी ओळखले त्याला

क्षणात मी ओळखले त्याला

1 min
555

क्षणात मी ओळखले त्याला...

क्षणात मी ओळखले त्याला...

हिरवाईच्या चित्तचोराला ...

ग्रिष्माने पोळलेल्या अवनीला ...

चिंब तो भिजवाया आला...

नटखट सावळा वळवाची सर होऊन आला...

क्षणात मी ओळखले त्याला...


क्षणभराचा ओलावा देऊन गेला...

किती प्रश्न विचारले मी त्याला...

वेडावून तो हसून बरसला...

माझ्या मनातला पाऊस आला...

कड्याकपारी झिलई करून गेला...

नटखट सावळा वळवाची सर होऊन आला...

क्षणात मी ओळखले त्याला...


रानभरी पाचूची मखलाशी तो करुन गेला...

मळभ मनातले घेऊन गेला...

हिरवाईचा मैतर निरोप मजला देऊन गेला...

लवाजमा मी घेऊन येतो कानी कुजबुजला...

आणावया रंग गंधाचा शिंपला... 

फिरुनी तो निघून गेला...

नटखट सावळा वळवाची सर होऊन आला...

क्षणात मी ओळखले त्याला...


धुव्वांधार कोसळण्या घेऊन येतो आषाढाला...

वदुनी तो गेला...

इंद्रधनुशी शिंपल्यात आणीन म्हणला श्रावणाला ...

हिरवाईचा पिंजण्या पसारा मी येतो सांगून गेला...

पाचूच्या बेटांची सफर घडवण्या उत्सुक तो दिसला ..

क्षणभराचा ओलावा देऊन गेला...

मृदुगंधाचे देऊन दान पसार तो झाला...

नटखट सावळा वळवाची सर होऊन आला...

क्षणात मी ओळखले त्याला...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics