STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

क्षण गुलाबी

क्षण गुलाबी

1 min
558


क्षण गुलाबी मोहरलेला

क्षण गुलाबी बावरलेला

क्षण गुलाबी सावरलेला.....

झोम्बणारा गार वारा

तू कसलेस बाहुपाश अन

अंगभर उठला शहारा

क्षण गुलाबी मोहरलेला....

रोम रोम खुलले माझे

केला लाजेने पोबारा

मोक्ष लाभला

डोळे दिपले पाहुनी

तुझिया मिठीत

स्वर्ग सारा....

क्षण गुलाबी मोहरलेला....

क्षण गुलाबी बावरलेले.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance