कसली ही जिंदगी...
कसली ही जिंदगी...
जगण्याची जिद्द
सोबत मरणाची आस
आयुष्याने धरलीय
कसली ही कास
कोण कुणाचं इथे
आयुष्यच् आपलं नाही
आपलं म्हणायला इथे
आपलं असं कुणी नाही
जगण्याचा अर्थ शोधता शोधता
मरणापर्यंत उत्तर जातं
आयुष्य म्हणजे निव्वळ
जन्मापासून मरणापर्यंतचं अंतर होवून जातं
कसली ही जिंदगी
कधी कधी वाटूनच जातं
नाही नाही म्हणता
आयुष्य एप्रिल फूल बनवून जातं
