कशासाठी
कशासाठी
भावना कोंडली कशासाठी
हुंदके दाबली कशासाठी
सूर माझा जुळे तुफानांशी
वादळे थांबली कशासाठी
भावना गोठल्या इथे सार्या
पेटल्या दंगली कशासाठी
जीव झाला पिसा तुझ्यासाठी
चांदणी लोपली कशासाठी
रंगला सामना तुझा माझा
माणसे नाचली कशासाठी
नाचतो हासतो किती वेड्या
आसवे झाकली कशासाठी
पुत्र मातेस सोडून गेला
नाळ ही कापली कशासाठी
