कसे सांगू तुला
कसे सांगू तुला
1 min
168
भाव अनामिक
मम मनातील
कैक उसळती
कितीक दाटती (1)
हृदय कोंदणी
प्रीत सजवली
अव्यक्त भावना
ओठीच अडली (2)
भेटता आपण
नजरानजरी
भाव मनातील
ते हृदयांतरी (3)
हे गूज प्रीतीचे
सांगावे तुजला
ओठी येऊनही
शब्द का अडला? (4)
नाते हे प्रेमाचे
बंध रेशमाचे
एकरुपतेचे
प्रीतीबंधनाचे (5)
जाणून नाथा घे
साथ दे मजला
भाव अंतरीचे
कसे सांगू तुला? (6