कस जगायचं तिने
कस जगायचं तिने
कस जगायचं तिने
अन्याय अत्याचाराला विरोध करुन..
गुलामगिरीतून मुक्त व्हावं...
त्या राजमाता जिजाऊसारख॔...
कसं जगावं तिने...???
परिवर्तनाचे धडे तत्वाने न गिरवता..
विचाराने न लिहीता..
क्रांतीची मशाल हाती घेत...
त्या सावित्रीमाई सारखं...
मग तर दिसणारच नाही
अन्याय अत्याचारात सापडलेली स्त्री..
मेलेली मन..जिवंतपणातच तडफडणारी प्रेत...
आणि दिसणारही नाही ...
अन्याय अत्याचारी मानसही...
कस जगायचं तिने...
राॅबिन हुडचा स्री अवतार घेऊन..
फुलनदेवी सारखं...
नाव ऐकताच थरकाप होणा-या...
किरण बेदी सारखं...
तेंव्हाच चौकाचौकात मुडदे गाडले जातील...
बलात्कार करणाऱ्या नराधमाचे...
हाच खरा न्याय असेल...
समाजव्यवस्थेच्या न्यायालयात...
