STORYMIRROR

Pratibha Bilgi

Tragedy Others

3  

Pratibha Bilgi

Tragedy Others

क्रूर खेळ

क्रूर खेळ

1 min
412


काळया आईच्या रक्षणेला 

राही जो तत्पर प्रत्येक क्षणाला

पूर येवो वा पडो भीषण दुष्काळ

सांभाळाया तिला करी जीवाचे आपुल्या रान


डोळ्यांत लपवून दुःख अन् अश्रु 

सदा जमिनीवर करतो लाख माया 

काबाडकष्ट करुन , करूनही सुश्रुषा 

त्याच्यावर कोणाला न आली दया


असा हा हाडाचा कष्टकरी

माझा भाऊराया शेतकरी

कर्जाच्या विळख्यात सापडला

शेवटी आत्महत्येला शरण गेला 


शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण रंगले

आत्महत्येचे प्रकरण सर्वत्र चर्चिले गेले 

समाचारपत्र आणि दूरदर्शन वाल्यांनी 

मीठ - मसाला लावून आपले टी.आर.पी वाढवले


काळया मातीच्या राजाचा बळी घेऊन

लोकांनी आपले पोट मात्र पोटभर भरले

आसवांच्या त्याच्या किंमत मोजून 

जबाबदारीतून पहा कसे मुक्त झाले


बायका - पोरांना त्यांच्या आश्वासने देत

सरकारे दिवस ढकलीत आहेत

जीव गेलाय अन्नदात्याचा तरीही

आकडेमोड यांची काही संपत नाहीये 


काबाडकष्ट करतो बैलजोडी जोततो 

दिवसरात्र पिकांची रखवाली करतो

पण त्याला या बदल्यात आपण काय देतो

मातीचा राजा शेवटी उपाशीपोटीच झोपतो


कधी संपणार हा क्रूर खेळ 

कधी सुटणार या कर्जेचा विळखा

कधी होणार माझा शेतकरी कर्जमुक्त 

आणि कधी मिळेल त्याला सुखाचा झोका ??


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy