STORYMIRROR

Raakesh More

Classics Inspirational Others

3  

Raakesh More

Classics Inspirational Others

करून बघ

करून बघ

1 min
129

प्रेम एकदा करून बघ 

जिवनाची मजा समजेल तूला 

प्रेम नाही केलंस तर 

जिवनाची सजा समजेल तूला || 1 ||

 

कोणाची वाट पाहून बघ 

प्रतिक्षेचं फळ समजेल तूला 

नाही वाट पहिली तर 

आयुष्य अचल समजेल तूला || 2 ||

 

कधी मैत्री करून तर बघ 

मैत्री ची शान समजेल तूला 

नाही मैत्री केलीस तर 

मैत्री ची तहान समजेल तूला || 3 ||

 

कुणासाठी जीव ओवाळून बघ 

आंतरिक समाधान मिळेल तूला 

नाही ओवाळलास जीव तर 

गळलेलं अवसान मिळेल तूला || 4 ||

 

कधी मुद्दाम हरून तर बघ 

मानसिक तृप्ती मिळेल तूला 

मुद्दाम नाही हरलास तर 

स्वार्थी क्लुप्ती मिळेल तूला || 5 ||

 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics