करू या वृक्षारोपण
करू या वृक्षारोपण
जीवसृष्टी आहे वैविध्यपूर्ण छान
पृथ्वी बहुविध आहे रत्नाची खाण
वृक्षवल्लीमध्ये औषध गुणकारी
पर्यावरण जीवसृष्टी हीच शान ||
वनस्पती आहेत स्त्रोत साधनसंपत्तीचे
वृक्षतोड थांबूनी जागा हो मानवा
संवर्धन आणि संरक्षण करूनी
एक -एक झाड लावूनी पर्यावरण वाचवा ||
नव्या पिढीला सांगून महत्व वृक्षारोपणाचे
पुढे करूनी कर दिव्य ते चरण
सभोवताली करूया वृक्षारोपण
झाडे लावून करूया वृक्षसंगोपन ||
पर्यावरण संवर्धन समृद्धीची वाट
हीच तर खरी आहे सर्वांची सुरक्षा
ऑक्सीजन मिळण्यासाठी उठली लाट
सर्वांनी पर्यावरणाची करू या रक्षा||
शिक्षणातून जाणीव जागृती करू या
वृक्षारोपण करून पर्यावरण अभ्यास
पर्यावरणाचा ऱ्हास आता थांबवू या
वृक्षारोपण करूनी निसर्ग बनवू खास ||
