कर्तव्याची दोरी
कर्तव्याची दोरी
स्त्री जन्मा अजब तुझी कहाणी
पायात तुझ्या दिसे
सदैव कर्तव्याची दोरी
आई, बहीण, मुलगी, पत्नी, आजी
म्हणून कर्तव्यदक्ष असणारी
आई म्हणून संस्कार करणारी
बहिणीची माया देणारी
मुलीचे कर्तव्य करणारी
पत्नीचे प्रेम देणारी
नातवंडांची प्रिय आजी
अशा अनंत भुमिकेत तु आहेस
भूमिकेतून समाज संस्करण होते आहे
संस्कृतीचे बीज तुझ्यात आहे
म्हणून इथली मातृभाषाही
आईची भाषा होते
तरीही हा समाज तुला
दुय्यम ठरवितो
नराधम तुझी विटंबना करतो
ईतिहासही तुझ्या शोषणाचे
पुरावे देतो
तुलाच आता सबळ होणे आहे
तुझे अस्तित्व निर्माण करायचे आहे
