कृष्णलीला
कृष्णलीला
खेळ चाले कान्हाचा
राधेस छळण्याचा,
गोपिका लागे हसण्यास
राधेस चिडवण्याचा.
घागर फोडी कान्हा
राधा वैतागे रागात,
कान्हा उभा असाच
जसे मग्न विचारात.
नदीकिनारी खेळ चाले
कृष्णलीला न कळे राधेश,
धुंद गोपिका पाहे लीला
दृश्य करे रोमांचित त्यास.
राधा बावरी रागे भरे
कृष्णास दाखवे घागर,
नीलवर्णीय कृष्ण उभा
जसे संथ दिसे सागर.

