STORYMIRROR

Bharati Sawant

Inspirational

3  

Bharati Sawant

Inspirational

क्रांतीसूर्य तू

क्रांतीसूर्य तू

1 min
238

रामजी न् भिमाईच्या घरात

हा क्रांतीसूर्य उदयास आला

सर्वधर्मसमभावासाठी त्याचा

सारा जन्म झगडण्यात गेला


काळाराम मंदिरात केलाच

अस्पृश्यबांधवांचा शिरकाव

प्रतिकार नि अन्यायाविरूद्ध

घेतलात तुम्ही हृदयाचा ठाव


बनला तुम्ही भाग्यविधाता

लिहिले या राष्ट्राचे संविधान

करूणाशील व्यक्तिमत्वाचा

वाटे आम्हा सार्थ अभिमान


पसरला होता दलितांच्यात

अज्ञान अन्यायाचा अंधकार

आला बनून महामेरू तुम्ही

सूर्यासम करण्यास प्रतिकार


शिका आणि संघटित राहा

आंबेडकरांचा हाच मूलमंत्र

जगण्यासाठी सुकर जीवन

वापरले त्यांनी जीवनी तंत्र


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational