क्रांतीसुर्य जोतिबा फुले
क्रांतीसुर्य जोतिबा फुले
क्रांतीसुर्य जोतिबा
माहात्मा पदवी मिळाली
जोतिबाच्या त्यागामुळे
शिक्षणाची महती कळाली
क्रांती जोतिने दिला
वारसा शिक्षणाचा
उजळून निघाला स्रीचा
आरसा जीवनाचा
भोगली दुुःख सारी
अपमान सहन केला
तरीही स्री शिक्षणाचा त्यांनी
विचार गहन केला
शिकवून सावित्रीला
अर्थ दिला जीवनाला
सोबतीने भार्याच्या
दिला उभार स्री मनाला
विधवा विवाहाचा
त्यांनी पुुरस्कार केेला
स्रीच्या अस्तित्वाचा आलेेख
त्यानी असा उंचीवर नेला
असा क्रांतीसुर्य
पुन्हा होणार नाही
कार्य त्यांचे महान इतके
या जगती अजरामर राही
