STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

करामत कर्तृत्वाची

करामत कर्तृत्वाची

1 min
175

दैवायत्तं कुले जन्म

मदायत्तं पौरुषम्

कर्तृत्वाने झळकावे

जन्म पूर्वसंचितम्   (१)


कर्ण महापराक्रमी

पुत्र कुंती दिनमणी

तरी अवहेलनाच

सूतपुत्र जन्मभरी   (२)


जन्म घरी गरीबाच्या

झगडूनी हो विद्वान 

किर्ती बाबासाहेबांची

जगामधे बुद्धिमान    (३)


हाती नाही येणे असे

म्हणताती सर्व जन

जन्म कुठे झाला तरी

चमकतो बुद्धिमान    (४)


दुर्दैवाने कलिकांची

होते हत्या गर्भातचि

कळी खुडूनी टाकती

काय म्हणावे भोगासी!!  (५)


जन्म मिळालासे तोचि

लावा हो सार्थकाप्रती

झोळी पुण्याची भरावी

गाठ पूर्वसंचिताची   (६)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract