कोरोनातली माणुसकी
कोरोनातली माणुसकी
प्रश्न पडे मानवाला
कुठे माणुसकी गेली,
गरीबास होरपळी
श्रीमंती माजलेली....
भ्रष्टाचार ना थांबे
जिवाचा खेळ चाले,
महाग झाली औषधे
प्राणवायू ही दुर्मिळ झाले....
हाक गरिबांची
माणुसकिस पुकारे,
अरे मानवा ऐक जरा
गरजेस हाक मारे....
हात देऊन हातात
कर सेवा माणुसकीची,
देव तारील त्याला
भक्ती पाहून मदतीची....
