STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

कोरोनाची करणी

कोरोनाची करणी

1 min
222

देवाची महान निर्मिती 

मानवास महामारी छळी, 

हाक देई हात जोडूनी 

नको आता परत घेऊ बळी. 


बालकास पोरके करुनी 

आई वडीलास नको देऊ दंड, 

नातेवाईक ही गेले कंटाळून 

मानव करे आता खरंच बंड. 


काम संपले, भूक वाढली 

बंद सारा शहर आज, 

जिथे पाहू तिथे दिसे 

कोरोना खेळेचा नवा साज. 


दुनिया विकली माणुसकीत 

जीवा पेक्षा किमती पैसा,

रोज नवी चाल चलती 

दुनिया दाखवी रंग रूप जैसा. 


प्राणवायू ही विकत मिळे 

तरी मानवास आज न कळे, 

खरंच ही देवाची करणी 

का मानवास कर्माचे फळ मिळे. 


निसर्ग ही दाखवावे रौद्र रूप

म्हणे मानवा खोटी तुझी साथ,

सोडून आता हुशारकी तुझी 

निसर्गासमोर टेकव हात.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational