कोरोनाचे हास्य..
कोरोनाचे हास्य..
जाग आली तेव्हा
गरगरले बातम्या ऐकून
तिडीक बसली डोक्यात कोरोनाची
कसला म्हटले हा लॉकडाऊन...?
"हास्य" खुलले पटकन
दिवसच आजचा हास्याचा
नकळत सारेच पोटात घालण्याचा
उसने अवसान आणून खिदळण्याचा...
घरीच राहायचे
आनंदीत राहायचे
हसत खिदळत
मस्त मजेत राहायचे....!
जागतिक हास्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
