STORYMIRROR

Akash Mahalpure

Others

3  

Akash Mahalpure

Others

माया बाप..!

माया बाप..!

1 min
217

आज माझे बाबा म्हणाले,

माह्या लेकानं माये नाव उंचावले

खरं सांगा मित्रानो

यापेक्षा मोठे मी काय कमावले...

पैसा नव्हता खिशात

पन उसनवारीने शिकवले

आत्मनिर्भरी होता बाप

पण मायासाठी चपला झिजवले

म्हणे तू लई मोठा हो

म्हणून डोईवर हात सजवले

खर सांगा मित्रांनो

यापेक्षा मोठे मी काय कमावले...

शेतमजुरी करून त्याने

पोटाची खळगी भरवली

उन्हातान्हात घाम पिऊन

पाण्याची तहान भागवली

रानात राहून उपाशी

माह्या भुकेचे स्वप्न सजवले

खरं सांगा मित्रानो

यापेक्षा मोठे मी काय कमावले....

नको मोठा बंगला मला

पैसा अडका काही नको

नको सुंदर देखणे रूप

सौदर्याची खान नको

माह्या यशाचे चित्र

त्यांनी डोळ्यात आपल्या सजवले

खर सांगा मित्रानो

यापेक्षा मोठे मी काय कमावले.....

भाकरी ठेऊन मला

ते उपाशीपोटी निजले

गरिबी होती मोलाची

त्यानीचं आम्हाला शिकवले

नशीब माझे की त्यांचे नाव

माझ्या नावापुढे लागले

खर सांगा मित्रानो

यापेक्षा मोठे मी काय कमावले...


Rate this content
Log in