माय मराठी
माय मराठी
1 min
261
मधुर रसाळ गोमटी
माझी मायबोली मराठी llधृll
मराठीची अविट गोडी
चाखतो आम्ही नित्य
अमृता सम गोड मराठी
हे त्रिकालातित सत्य l१l
ज्ञानोबांनाही भुरळ पडली
माय मराठी च्या गोडीची
मराठीतून टिका केली
श्रीमदभगवतगीतेची I२l
भाषा रूपी भगीनींमध्ये
मराठी ची श्रेष्ठता मोठी
गान तिचे करण्यास
माझी योग्यता पडे थिटी l३l
मराठीतूनी लिहिल्या
संतांनी अविट गाथा
अभंग ओव्यांतुनी गायीली
भगवंताची महत्ता l४l
अनुस्वार रफार ह्रस्व दीर्घ
पूर्णविराम ल्याली
काना मात्रा ऊकार वेलांटीने
अलंकृत जाहली l५l
