STORYMIRROR

Akash Mahalpure

Others

4  

Akash Mahalpure

Others

अभिमान तिरंग्याचा..!

अभिमान तिरंग्याचा..!

1 min
494

चाली-रिती, खाणं-जेवण वेगवेगळे

प्रांत-जात, भाषा-धर्म जरी निराळे

एक राष्ट्र अन् एक तिरंगा ध्वज आमुचा

प्रतिक आम्हा भारतीयांच्या अभिमानाचा


लढले किती, किती गेले फाशी तिरंग्यासाठी

रक्त ओकले परी एकनिष्ठ राहिले तिरंग्याप्रति

लाभले तुम्हा ना स्वातंत्र्य हे फुकाचे

जाणा मोल तुम्ही सदैव स्वातंत्र्याचे


लावती सैनिक बाजी आपुल्या प्राणाची

राखण्या आण-बान-शान तिरंग्याची

ते चिंता करती देश, देशबांधवांची

ना क्षीती तयांना केवळ स्व कुटुंबाची


जिवंतपणी ते तिरंगा मिरवती छाती

जाहले हुतात्मा तरी तिरंगा लपेटून येती

तुम्ही नसाल सैनिक जरी, असाल नागरिक

ठेवा तिरंग्या परी सदा भावना, निष्ठा नेक..!


Rate this content
Log in