STORYMIRROR

Akash Mahalpure

Others

3  

Akash Mahalpure

Others

अशी कशी रे अंधश्रद्धा..!

अशी कशी रे अंधश्रद्धा..!

1 min
343

डोळस असून 

आंधळा तू रे

विज्ञान युगातला 

मानव तू रे...


अंधश्रद्धेस बळी 

कसा रे पडतो 

विचार न करता 

कुठंही धावतो...


लेकरं-बाळं होण्या 

बायकोला बुआ जवळ नेतो 

सुशिक्षित म्हणवतो 

डॉ. चे उपाय खोटे ठरवतो... 


दुष्ट काढणे तुला 

वारंवार जमते 

लसीकरण बाळाचे 

विसरलोच सांगते 


चंद्रावर पोहोचलो 

निरीक्षण कुठे विसरलो 

प्रयोग नको चिकित्सा नाही 

खुळचट कल्पनेवर विश्वासलो...


कार्यकारण शोधावं 

चिकाटी ठेवावी 

अंधश्रद्धेचे भूत 

कायम मोडावी...


कास धरावी 

विज्ञानाच्या प्रगतीची 

स्वतःच्या विश्वासावर 

नवे शोध लावण्याची...


अंधश्रद्धा नसावी 

श्रद्धा ठेवावी 

पावलं चालावी 

प्रगती करावी...


Rate this content
Log in