मराठी शाळा..!
मराठी शाळा..!
1 min
474
शाळा सुटली पाटी फुटली
गाणे हे सहज आठवले
प्राथमिक शिक्षण सुंदर
पुन्हा त्यात मन रमले…१
अ आ इ ई धडे गिरवले
१ २ ३ ४ ५ पाढे वाचले
नाही कळले काहीच तरी
वहीच्या पानांचे विमान झाले…२
मस्ती केली खूप खूप
धिंगाणा तो भरपूर झाला
मास्तरांच्या खुर्चीवर
चिंगमसुद्धा तो चिटकला…३
बोट फुटले खेळता खेळता
पाय लचकला उड्या मारता
दगड मारला बोर खायला
मज्जा आली आंबे चोरता…३
किती या आठवणी
कशा त्या सांगाव्या
शब्द निःशब्द होती
आपण त्या जाणून घ्याव्या…४
