STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

कोरोना

कोरोना

1 min
181

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  असह्य दुःखाचा अन्

  निर्दयी अमानुषतेचा,

  खेळ मांडला कोरोनाने

  नकोनकोशा भावनेचा....


  किती दिवस चालणार

  माहीत नाही हे डाव,

  कितीतरी साल जातील

  भरून येण्यास हे घाव....


  असा कोप सृष्टीच्या 

  निर्मीतीपासून नसेल,

  महामारी आल्या-गेल्या

  श्वास तरी मुक्त असेल....


  निसर्गाने असा अघोरी 

  खेळ कधीच न मांडलेला,

  जीवघेण्या या खेळात

  माणसापासून तोच दुरावलेला


 सारे कसे बंदीवान झाले

 श्रद्धेवरही संकट ओढवले,

 तारणारा कोणीच नसे

  देवानेही नाही सोडवले...


 आपण या खेळात मात्र

 बचाव करत राहायचा,

 मांडलेल्या खेळात मात्र

 चतुराईने जीव वाचवायचा...

🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational