कोरोना संक्रमण
कोरोना संक्रमण
टाळण्यास संसर्ग
पाळावे नियमास,
वापरून हे मास्क
ठेवून संयमास.
नको अज्ञात स्पर्श
स्वच्छ हात धुवावे,
न खाता बाहेरचे
घरातच मन लावावे.
दूर ठेवावे अंतर
एकमेकांपासून,
शिंकताना खोकताना
वाचा संक्रमणातून.
पौष्टिक आहार योग्य
मनास प्रफुल्ल ठेवी,
योगशास्त्राने मानवास
नेहमी निरोगी ठेवी.
घेता सर्व काळजी
तपासणी करून घ्यावी,
डॉक्टरांच्या सुचनेनुसार
घरीच खबरदारी घ्यावी.
