STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

कोरोना काळातले शिक्षण

कोरोना काळातले शिक्षण

1 min
985

कोरोनामुळे झाली सुरू 

ऑनलाईन मुलांची शाळा,

पालकांबरोबर शिक्षक ही 

वैतागून म्हणे अभ्यास कर बाळा. 


झूम गुगल मीट सुरू झाले 

मुले त्यात गुंतून गेले, 

चालू बंद कसे करावे 

यातच बरेच दिवस निघून गेले. 


ग्रहपाठाची सवय मोडली 

मोबाईलची रेंज सापडेना,

मुलांची झाली मज्जा 

लिंक ओपन होईना. 


शाळेतला प्रत्यक्ष अभ्यास 

ऑनलाईने अप्रत्यक्ष झाला,

शिकण्यासाठी धडपडणारा जीव 

कोरोना काळात निवांत झाला.


आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे 

कोरोनाने सगळ्यांना दाखवले,

घरबसल्या शिकून सारे 

देशाच्या विकासात वहावले.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational