कोरोना... अंधश्रद्धेला नको थारा
कोरोना... अंधश्रद्धेला नको थारा
चायना देशाचा आलाय परदेशी रोगी पाहुणा
मनात घर नि जगी चर्चेत नावाचा कोरोना
आपल्या स्वार्थापायी केली निसर्गाची वानवा
आता भीतीपोटी चिंताग्रस्तांना वेदना सोसवेना
जीवघेण्या आजारांचा अमर्याद वाढता प्रादुर्भाव
असो कोणताही विषाणू मेव्हणा काळजी घेऊया
अफवा नि फॉर्वर्डेड संदेशांवर करून कानाडोळा
निरोगी आरोग्याविषयी सतर्क आपण होऊया
आपापल्या कर्तव्य नि सहानुभूतीची ठेऊन जाण
देवाचं देवपण माणसास माणूस समजण्यात
विश्वासाच्या मोत्यांनी जवळच्या माणसांची
प्रेमाने नि मायेने हृदयात फुलमाळ ओवण्यात
देवावर असावी अपार श्रद्धा पण नको अंधश्रद्धा
डॉक्टर, नर्स यांच्यात माणूसरुपी प्रेमळ देवदूत
अतिरेकी विश्वासाचा इथे भोंदूगिरीने जातो जीव
म्हणुनी श्रद्धेसोबत वैचारिकतेचे विचारी सूत
विषाणूस नाही उपलब्ध एक प्रभावी उपचार
अधिक काळजी घेणे हाच एक मात्र सहारा
आधीच भरपूर अमानुषतेची भयानक महामारी
अविचारी विश्वासातून नको अंधश्रद्धेस थारा
गर्दीचे ठिकाण टाळून लुटू कुंटुंबासोबत मौज
संसर्ग रोखण्यास सॅनिटायझर नि मास्कचा वापर
अन्नसुरक्षेची खबरदारी घेऊन लढायला सज्ज
अंधश्रद्धेपायी संस्कृतीवर कशाला हवंय खापर
महामारीचा नाही ओरबाडलेल्या निसर्गाचा कोप
सौहार्दाने जपून होऊ पीडितांचा मानसिक आधार
न घाबरता तपासण्या नि उपचाराची मनी कास
चला करूया कोरोनामुक्त भारताचे स्वप्न साकार