STORYMIRROR

Shital Yadav

Tragedy

2  

Shital Yadav

Tragedy

कोण आहे माझं

कोण आहे माझं

1 min
14.8K



असंख्य योजना येती

मिटविण्या बेकारीला

कोण आहे माझं इथे?

प्रश्न पडतो शेतकऱ्याला


फुलविण्या शिवाराला

घामाचे मोती गाळतो

वैशाखाच्या उन्हातही

पाण्यासाठी रक्त जाळतो


सत्तेपुढे शहाणपण नाही

रिकामी गरीबांचीच झोळी

भ्रष्टाचाराचा वाढे भस्मासुर

नेत्यांच्या ताटात तूपपोळी


वाढते देशात अशांतता

जाती-धर्मांच्या नादात

एकमेकांवर चिखलफेक

राजकारणाच्या वादात


डोळे झाकून या नेत्यांवर

भरवसा असा का ठेवतो?

अंधाऱ्या झोपडीत जसा

मिणमिणता दिवा तेवतो


कष्टाच्या मीठ भाकरीला

सर नाही पंचपक्वानांची

बळीराजाही सुखावेल जर

जोड मिळेल शिक्षणाची


किती रात्री उपाशीपोटी

पोराबाळांस झोपवताना

भूकेने जाळला देह आतून

मरणयातनाच जगतांना


का? सावकाराने छळले

मातीमोल विकली शेती

कोण आहे माझं इथे ?

जे या प्रश्नाचे उत्तर देती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy