STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

कोकणमेवा

कोकणमेवा

1 min
337

सुट्टी लागली जाऊ या

रत्नागिरी आजोळला

वाट पहाती आजोबा 

आजी तयार खाऊला 


आंबा फणस पोळीचा

गोड सुगंधित वास

आंबे पिकती अढीत

येई मधुर सुवास    


काजु , पोहा मिरगुंड

मऊ भात जिरेसाळ

मेतकूट नि लोणचे

वर असे तूपधार     


मावा आवळा सुपारी

पेठा आवळा सुंदर 

पन्हे कोकम आवळा

सरबते हो मधुर      


आले लिंबू नि जांभूळ

करवंद सरबत

गोड कोकम आगळ 

तृप्त रसना मनात   


असे पोटभरी खावे

अन् शांत झोप यावी

आजोळचे सुख भारी

इच्छा रहाण्याची व्हावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract