कोजागिरी
कोजागिरी
शरदाचं टिपूर चांदणं
चंद्र प्रकाश जलाशयात
सृष्टीचा सुंदर नजारा हा
पाहतांना मन आनंदात
टपोरा चंद्रमा नभांगणी
गोलमटोर छान दिसतो
दुग्धाळलेल्या लाटांची ती
रत्नाकर नक्षी ती काढतो
सागर किनाऱ्यावर गोटे
मांडलेली छान आरास
गुलाबी पुष्प सुंदर वाहून
दिपक ठेवले त्यात खास
गुलाबी ,जांभळेसर छान
फुलांने वाढे किनारी शोभा
जलाशयात चमकते पूर्ण
चंद्रमाची नभांगणी आभा
कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र
करूया कर जोडून वंदन
नारळाचे झाड डोलते पहा
सुंदर किनाऱ्याचे नंदनवन