STORYMIRROR

Rahul Salve

Inspirational

3  

Rahul Salve

Inspirational

आमुचा मराठवाडा

आमुचा मराठवाडा

1 min
366

सुखसमृद्धीने नटलेला जसा राजवाडा

डौलाने डोलतोय आमुचा मराठवाडा


पर्यटनाची राजधानी वैभवशाली औरंगाबाद

वेरूळ, अजिंठा लेण्या घालती मनाला साद


विद्यापीठाची ज्ञानगंगा वाहती घरोघरी

भरवतेय विद्यार्थ्यांना शिक्षणाची शिदोरी


ताजमहलची प्रतिकृती बिबी का मकबरा

झाडं फुलांनी नटलेला समृद्ध निवारा


गोदावरीचे गंगापरी वाहणारे पवित्र पाणी

ज्ञानोबा एकनाथ, मुक्ताईची गाजे अभंगवाणी


वारसा लाभला सारा गड किल्ले,लेण्यांचा

जपलेला ठेवा सांगतोय इतिहास मराठवाड्याचा


दिला वीरांनी मुक्तीसंग्रामाचा शौर्य लढा

स्वतंत्र झाला गुलामगिरीतून मराठवाडा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational