Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shobha Wagle

Inspirational

4.0  

Shobha Wagle

Inspirational

श्री गणेशा

श्री गणेशा

1 min
267


प्रथम वंदिते । गणपती तुला ।

विद्या दे ना मला । गजानना ।।१ ।।


आले दर्शनाला । देवा गजानना ।

करते वंदना । मनोमनी ।।२ ।।


दीनाचा कैवारी । कृपेचा सागर ।

भक्तांचा आदर । विनायका ।।३ ।।


बुध्दी दे सकलां । परोपकारांची ।

ती सद् गूणांची । गणाधिशा ।।४ ।।


गणेश चतुर्थी । आनंदी गोंधळ ।

भक्त ते सोज्वळ । गुण गाया ।।५ ।।


देवा श्री गणेशा । तू विघ्न हरता ।

दुःख निवारता । विघ्नेश्वर ।। ६ ।।


महा गणेशा । गौरीच्या तनया

मंगल मोरया । गणपती ।। ७ ।।


विद्येचा नायक । तूच विद्याधर ।। 

कटी पितांबर । वृक्रतुंड ।। ८ ।।


गणेश जयंती । जन्म उत्सवाचा ।

महा सोहळ्याचा । गणेशाचा ।।९ ।।


निरंतर तुझी । राहो कृपा दृष्टी ।

सकलां संकटी । हे गणेशा ।।१० ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational