Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

rajashree Wani

Inspirational

3  

rajashree Wani

Inspirational

राजा शिवछत्रपती

राजा शिवछत्रपती

1 min
168


 धन्य झाली शूर वीरांगना माता 

 शिवनेरीवर पुत्र शिवराय जन्मले 

 जिजाऊंनी बालपणीच लढण्याचे 

 युद्धकला व राजनीतीचे मंत्र दिधले ..


 स्वराज्य स्थापना व स्वाभिमानाचे

 जिजाऊंनी अमृतमयी संस्कार दिले

 प्रत्येक स्त्री आईसमान असते बाळा

 तिजचरणी स्वर्ग बघ असे मनी बिंबविले..


 गड-किल्ले जिंकण्याचा ध्यास घेऊनी

 निष्ठावंत प्राणप्रिय मावळे जमविली 

 गद्दार नीतीभ्रष्ट दुराचारी शत्रूस राजांनी

 गनिमी कावा व वीरतेने माती चाखविली..


 हिंदवी स्वराज्याचे प्रथम तोरण बांधूनी 

 जन मनात दृढ स्वाभिमान जागविला

 आईभवानी व स्वामींच्या आशीर्वादाने 

 मावळ्यांसह शिवबांनी इतिहास रचिला..


नीतिमूल्य शिस्त एकात्मतेचे प्रतिक शिवराय

माती व जनतेवर अतूट प्रेम केले तिन्ही सांजा

असा तेजपुंज विश्वासू मर्द मावळा शिवनेरीचा 

बनला रयतेचा वाली लोकप्रिय जाणता राजा..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational